शहादा-पुणे स्लिपरकोच शिवशाही बससेवेचा प्रारंभ

0

शहादा । शहादा- पुणे स्लिपरकोच शिवशाही बस बुधवारपासुन सुरु करण्यात आली. बुधवारी परिवहन महांडळाचे अधिकारी आणि मान्यवरांच्या उपस्थितीत या नविन गाडीचा शुभारंभ करण्यात आला. राज्यभरात राज्य परिवहन मंडळाने पाच मार्गावर स्लिपरकोच शिवशाही बस सुरु केल्या. या पाच मार्गात शहादा- पुणे हा एक मार्ग असुन धुळे विभागात स्लिपरकोच शिवशाही सुरु करण्याचा मान शहादा आगाराला मिळाला. बुधवारपासुन ही बस प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली. बुधवारी रात्री या बससेवेचा शुभारंभ करण्यात आला.

भरघोष प्रतिसादाची अपेक्षा
यावेळी आमदार उदेसिंग पाडवी, नगराध्यक्ष मोतीलाल पाटील, जि. प. सदस्य अभिजित पाटील, शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख अरुण चौधरी, प्रा. सखाराम मोते, परिवहन मंडळाच्या विभाग नियंत्रक मनीष सपकाळ, विभागीय वहातूक अधिकारी किशोर महाजन, सांख्यिकी अधिकारी पवार, आगार प्रमुख योगेश लिंगायत, स्थानक प्रमुख संजय कुलकर्णी, सहाय्यक कार्यशाळा अधिकारी एस.एम. शेख, वाहतूक अधिकारी संजय अवस्थी, भाजपचे डॉ. किशोर पाटील, राष्ट्रवादीचे अनिल भामरे, प्रवासी संघटनेचे प्रा. दत्ता वाघ, प्रा. रवींद्र पंड्या, प्रा. एल.एस. सैय्यद, प्रा. ग्यानी कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते. विभाग नियंत्रक मनीष सपकाळ यांनी यावेळी बोलताना शिवशाहीला शहादेकर प्रवाशांकडुन भरघोस प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली. नगराध्यक्ष मोतीलाल पाटील यांनी शहादा आगार अत्याधुनिक करण्याची मागणी यावेळी केली तर आमदार उदेसिंग पाडवी यांनी शहाद्याहुन मंत्रालय गाडी सुरु करण्याची मागणी केली. सुत्रसंचलन संजय कुलकर्णी यांनी केले. ही बस शहाद्याहुन दररोज रात्री 9 वा तर पुण्याहून रात्री 9-30 वा. सुटेल. शिवशाहीर बस मध्ये सि.सि.टी.व्ही. कॅमेरे मोबाईल चार्जर , व्हाय फाय , आदी सुविधा देण्यात आल्या आहेत.