शहादा (बापू घोडराज) । येथील नगरपालिका प्रभाग क्र.3 मध्ये पोटनिवडणुकीसाठी निवडणूक प्रक्रिया सुरु झाली असून अनेक इच्छुक उमेदवांरानी पक्षश्रेष्ठींकडे साकडे घातले आहे, तर काहींनी स्वतःच एकला चलो रे म्हणंत निवडणूक लढविण्याची तयारी केल्याचे चित्र आहे. ऑनलाईन उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार असल्याने अनेकांची फजिती होणार आहे. या प्रभागात जास्त करून मुस्लिम मतदार असल्याने मुस्लिमविरोधात इतर कोणत्याही समाज उमेदवार निवडणूक लढविणार नाही. हे मात्र निश्चित असले तरीही भाऊगर्दी होणार आहे. या प्रभागात 1537 पुरूष, 1277 स्त्री मतदार आहेत. एकूण 2 हजार 814 मतदारांसाठी 3 मतदन केंद्रावर व्यवस्था करण्यात आली असुन एक जागेसाठी किती उमेदवार निवडणूक रिंगणात उतरतात याकडे लक्ष लागुन आहे.
मोर्चेबांधणीला जोरदार सुरूवात
शहादा नगरपालिकेच्याच्या पोटनिवडणुकसाठी निवडणुक कार्यक्रम जाहीर झाला असून 13 डिसेंबरला मतदान होणार आहे. त्या आधारावर मोर्चे बाधणी सुरु झाली आहे जिल्ह्यातील नगरपालिका निवडणूका सोबत शहादा पालिकेची पोटनिवडणुक घेतली जात आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार मनोज खैरनार काम पाहत आहेत. शहरात आचार सहिता लागु केली आहे. 18 ते 24 नोव्हेंबर पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार 25 नोव्हेंबर अर्जाची छानंनी, 30 नोव्हेंबर उमेदवारी अर्ज माघार 13 डिसेंबर ला मतदान 14 डिसेंबर रोजी निकाल जाहीर केला जाणार आहे.
एमआयएमचा काँग्रेसला पाठिंबा
प्रभाग क्र.3 मधील एमआयएमचे नगरसेवक सद्दाम तेली यांच्या खुन झाला होता. त्याच्या रिक्त जागेसाठी पोटनिवडणुक जाहीर झाल्याने अनेकांनी उमेदवारीसाठी प्रयत्न सुरु केले आहेत. गेल्या काही दिवसापुर्वी एमआयएम पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असोद्दीन ओवेसी हे स्वर्गीय सद्दाम तेली यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या परिवाराची भेट धेतली होती. त्यामूळे पोटनिवडणुक चांगलीच रंगणार आहे. यापुर्वी प्रभाग क्र. 2 व 3 या दोन्ही प्रभागातुन चार ही नगरसेवक एमआयएमचे निवडून आले होते, त्यात सद्दाम तेलीचा समावेश होता. इतर मागास प्रवर्गातुन निवडणूक लढवली होती. निवडणुक नंतर राजकारणाची समिकरण बदलुन एमआयएम च्या 4 नगरसेवकांनी काँग्रेसला पाठींबा दिला होता, जो आजतागायत कायम आहे. स्वर्गीय सद्दाम तेली यांचे बंधु वसीम तेली हे एमआयएमकडून उमेदवारी करणार आहेत. त्यांचे विरोधात भाजपा सह अपक्ष उमेदवार निवडणूक लढण्याची शक्यता आहे, तर काँग्रेसपक्षाची भूमिका अस्पष्ट असल्याने उमेदवार ही संभ्रमात आहेत.
शनिवारपासून ऑनलाईन अर्ज दाखल
18 नोव्हेबर पासुन ऑनलाईन उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार असुन ईच्छुक उमेदवाराना स्थावर मालमत्तेचा, दोन आपत्याचा दाखला, शचालयाचा दाखला , बँक कर्ज रोखे किती, थकबाकी आदी दाखल्यांचा पुरावा सादर करावा लागणार आहे. सभा परवानगी, नामनिर्देशनपत्र हे 18 ते 24 नोव्हेबर दुपारी 3 वाजेपर्यंत सादर उमेदवारांना करावे लागणार आहे.