शहादा पोटनिवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी

0

शहादा । येथील नगरपालिका प्रभाग क्र. 3 मध्ये पोटनिवडणुक जाहीर झाली असुन 13 डिसेंबरला मतदान होणार आहे. शहरात निवडणूकीसाठी मोर्चे बाधणी सुरु झाली आहे. जिल्ह्यातील नगरपालिका निवडणूकासोबत शहादा पालिकेची पोटनिवडणुक घेतली जात आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार मनोज खैरनार काम पाहत आहे. निवडणूकीची आचारसंहिता लागू झाली आहे. 18 ते 24 नोव्हेंबर पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करावयाची असून 25 रोजी होणार आहे. 30 रोजी माघारीची अंतिम मुदत असून 13 रोजी मतदान घेण्यात येणार आहे. मतमोजणी 14 डिसेंबरला होणार आहे. प्रभाग क्रमांक 3 मधील एम.आय.एम.चे नगरसेवक सद्दाम तेली यांच्या खुन झाला होता.

काँग्रेस अलिप्त
खुन प्रकरणातील आरोपी तिन महिन्यापासून तुरूंगात आहेत. आता पोटनिवडणुक जाहीर झाल्याने अनेकांनी उमेदवारीसाठी प्रयत्न सुरु केले आहेत. दरम्यान गेल्या दहा दिवसापुर्वी एम.आय.एम.पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असोद्दीन ओवेसी नंदुरबार दौर्‍यावर आले असता त्यांनी शहादा येथे भेट देवुन सद्दाम तेली यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या परिवाराची भेट धेतली होती. सद्दाम तेली यांचे बंधु वसीम तेली यांना उमेदवारी मिळणार असल्याचे बोलले जात आहे. त्यांच्या विरोधात भाजपसह दोन ते तीन अपक्ष उमेदवार निवडणूक लढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे तर कॉग्रेसने कोणालाही पाठींबा न देता निवडणूकीपासून लांब राहण्याचा निर्णय घेतले असल्याचे बोलले जात आहे.