शहादा पोटनिवडणूक ; एमआयएमचे वसीम तेली विजयी

0
शहादा : पालिकेच्या प्रभाग तीन ब च्या पोटनिवडणुकीत एम्आयएम् पक्षाकडून वसीम सलीम तेली व अपक्ष उमेदवार अब्दुल नईम मिस्तरी यांच्यात  सरळ लढतीत वसिम तेली यांनी सर्वाधिक १६५३ मते मिळवून  आपले प्रतिस्पर्धी उमेदवार अब्दुल नईम मिस्तरी यांची अनामत रक्कम जप्त केली. मिस्तरी याना १२८ मते पडली. एमआयएम विजयी उमेदवारच्या कार्यकर्त्यानी डिजेच्या तालावर विजय मिरवणूक काढून आंनदोत्सव साजरा केला .