शहादा बस आगारात त्वरीत सीसीटीव्ही कॅमेरे बसवा

0

शहादा । भाजपा शहराध्यक्ष व कार्यकारिणीने शहादा बस आगार प्रमुख यांच्याशी बस आगार (बस स्टँण्ड) मध्ये सी.सी.टि.व्ही.कँमेरे बसविण्याविषयी चर्चा केली, महिलांची गळ्यातील सोन्याची पोत, पर्समधील पैसे, सोनं लंपास होण्याचे प्रमाण वाढत चालले आहे बस आगार मध्ये चोरी करणारी टोळी गर्दी जास्त असल्याचा फायदा घेत लगेच फरार होतात म्हणुन पोलिसांना पुरावे सापडत नाही फक्त पुढे चोराचा शोध किंवा चौकशी चालु असते. या चोरांची टोळी किंवा चोरांचा चेहरा सी.सी.टि.व्ही.कँमेरा मध्ये टिपले गेले पाहिजेत व पोलीसांना शोध घेणे किंवा पकडणे शक्य होईल हा हेतू आहे.

पुढील आठवड्यात कार्यवाहीचे आश्‍वासन
बस आगार प्रमुखांनी सांगितले बंद पडलेले सी.सी.टी.व्ही कँमेरे पुढच्या आठवड्यात कार्यान्वित होतील असे ठोस आश्‍वासन दिले. या विषयी चर्चा करतांना शहराध्यक्ष जितु जमदाडे, उपाध्यक्ष विनोद जैन, जयेश देसाई, सरला हलपाणी, महामंत्री शैलेश मराठे व हितेंद्र वर्मा, कोषाध्यक्ष भटु सोनवणे, प्रमोद महाजन कौ.वि.योजना प्रमुख कमलेश जांगिड, व्यापारी आघाडी उपाध्यक्ष नटवर हलपाणी, ओ.बी.सी.मोर्चा उपाध्यक्ष अक्षय अमृतकर व सोनार सर, महामंत्री सचिन शिंपी, भटक्या वि.शहराध्यक्ष जँकी शिकलीकर व महेंद्र बडगुजर उपस्थित होते.