शहादा । शहरात अचानक 19 जुलै रोजी रात्री खेतीया रस्त्यावरील स्वागत परमिट बियर बार व मनोहर साळी दारु दुकान दारूबंदी अधिकार्यांनी बंद केल्याने शहरात उर्वरित कमीत कमी सात दुकाने येत्या दोन दिवसात बंद होण्याची शक्यता आहे. उच्च न्यायालयाचा आदेशानंतर राष्ट्रीय व राज्यमार्गवरील 500 मीटर अंतरावर असलेल्या परमिटरुम बियर बार दारुची दुकाने बंद करण्याचा आदेश दिल्यानंतर बंद करण्यात आले. शहादा शहरात बारा व ग्रामीण भागातील 10 दारुची बियर बारची दुकाने तीन महिन्यापासून बंद केलेत त्यांचे रजिस्टर परवाना अधिकार्यांनी जमा केला आहे. अंकलेश्वर बर्हाणपूर राज्यमार्गाला लागुन असलेल्या व सोनगीर ते खेतीया या मार्गांवरील दुकाने बंद केल्यानंतर काहीनी शहादा शहरात सात ते आठ दुकानी सुरु आहेत त्याही बंद करण्यात याव्या अशी मागणी केली होती त्यात नगरसेवकांचा ही समावेश होता. तक्रारीत डोंगरगाव रस्ता हा सार्वजनिक बांधकामाचा आहे. नगरपालिकेत हस्तांतरित झालेला नाही, म्हणून तहसिल कचेरीपासून 500 मिटरचा आत येणारी दारुची दुकाने परमिट बियरबार सुरु असल्याचा तक्रारी होत्या.
वार्तास अधिकार्यांकडून दुजोरा
डोंगरगाव रस्ता बांधकाम विभागाच्या क्षेत्रात असल्याचा दुजोरा अधिकार्यांनी दिला. तिन महिन्यापासून ज्यांचे परमिट बियरबार बंद आहेत ते सुरु करण्यासाठी परवाना धारकानी वेळोवेळी मुंबई येथे मंत्रालयात धाव घेतली पण त्यांचा व्यवसायावर कायमस्वरूपी टांगती तलवार आहे. 19 जुलै रोजी दोन दुकानी सिल केल्यात याचा अर्थ या दोन परमिट बियर बारापेक्षा इतर परमीट रुम बियरबार देशी दारुचा दुकानी डोंगरगाव रोडपासुन अधिकजवळ असल्याने उर्वरित सात ते आठ दुकानी बंद होण्याची शक्यता आहे. दोन दुकाने बंद होण्याची शक्यता आहे दोन दुकाने बंद केल्याने उर्वरीत दुकान परमीट रुम बंद कराव्याच लागतील अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.