शहादा । येथील माजी नगरसेवक व न.पा. शिक्षण समितीचे माजी सभापती, पत्रकार कैलास मनोहर चौधरी (वय 47 वर्षे) यांचे 20 डिसेंबर रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पाश्च्यात आई, वडील, पत्नी, दोन मुली, मुलगा असा परिवार आहे. कैलास चौधरी यांनी अनेक वर्षे शहादा येथून विविध वर्तमानपत्रातून वार्ताहर म्हणून कार्य केले आहे.
तर त्यांनी ’वाघदरी’ नावाचे स्वतःचे साप्ताहिकही चालविले होते. विवेक प्रिटींग प्रेस च्या माध्यमाने त्यांनी छपाई क्षेत्रातही नावलौकिक मिळविले होते. स्वामी विवेकानंद सांस्कृतिक मंडळाच्या माध्यमाने ते समाज कार्यातही सदैव अग्रेसर होते. स्वामी विवेकानंद गणेश मंडळाचे ते संस्थापक असून अनेक वर्षे ते या मंडळाचे अध्यक्ष राहिले आहेत. त्यांच्या अचानक निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.