शहादा येथील पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयात आयोजित मेगा पूल कॅम्पस इंटरव्ह्यूत ४८ विद्यार्थ्यांची सन फार्मासुटीकल मेडिकेअर लिमिटेड कंपनीत निवड..

शहादा दि३ पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय, शहादा येथे मेगा पूल कॅम्पस इंटरव्ह्यू (प्रत्यक्ष मुलाखती) चे आयोजन करण्यात आले होते. सदर कॅम्पस इंटरव्ह्यूसाठी गुजरात राज्यातील बडोदा येथील नामांकित सन फार्मासुटीकल मेडिकेअर लिमिटेड कंपनीचे अधिकारी पूल कॅम्पस इंटरव्ह्यू (प्रत्यक्ष मुलाखत) घेण्यासाठी आले होते. त्यात कंपनीचे हेड एचआर प्रणव पारीख, एचआर मॅनेजर विनय सोलंकी, प्रोडक्शन मॅनेजर राजकुमार पाटीदार, प्रोडक्शन मॅनेजर योगेश चंदर, एक्झीक्युटिव्ही ऑफिसर जगदीश पाटील यांनी इंटरव्ह्यू घेतले. सदर कंपनीत प्रोडक्शन, क्वालिटी कंट्रोल, क्वालिटी अशुरन्स, मायक्रोबायोलॉजी विभागात सुपरवायझर व ऑपरेटर ह्या पदांसाठी विद्यार्थ्यांची इंटरव्ह्यू घेण्यात आली असून नोकरीचे ठिकाण बास्का, बडोदा आहे. सदर पूल कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये एकूण ३५० पेक्षा जास्त विद्यार्थी उपस्थित होते. त्यापैकी एकूण ४८ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली असून त्यांना त्याबाबतचे पत्र हे ई -मेल द्वारे कळविण्यात आले आहे. या पूल कॅम्पस इंटरव्ह्यू (प्रत्यक्ष मुलाखत) मध्ये ज्या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे अशा विद्यार्थ्यांना कंपनीतर्फे चांगले व उत्तम पॅकेज दिले जाणार आहे. सदर कॅम्पस इंटरव्ह्यूसाठी पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री बापूसाहेब दीपकभाई पाटील, उपाध्यक्ष श्री जगदीशभाई पाटील, मानद सचिव ताईसाहेब श्रीमती कमलताई पाटील, शैक्षणिक व सामान्य प्रशासन विभागाचे समन्वयक प्रा.मकरंदभाई पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्री मयूरभाई दीपक पाटील, प्राचार्य डॉ.एस.पी.पवार यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा.डॉ.जवेश पाटील, प्रा.समीर शेख, महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षेत्तर कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले.

● चौकट ●
संस्थेतर्फे नेहमीच परिसरातील सर्वसामान्य जनतेच्या, शेतकरी कुटुंबातील मुला – मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी व विद्यार्थ्यांच्या हितासाठी
परिसरातील व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना चांगल्या ठिकाणी नोकरी उपलब्ध करून त्यांना नोकरीसाठी इतर ठिकाणी भटकंती करावी लागणार नाही ह्या दृष्टीने, उद्देशाने सदर कॅम्पस इंटरव्ह्यूचे आयोजन करण्यात आले होते त्यास चांगला प्रतिसाद मिळाला.
(बापूसाहेब दीपकभाई पाटील – अध्यक्ष – पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळ, शहादा)