शहादा । येथील महावीर इंग्लिश मीडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. बीड जिल्हा भारत आणि स्काऊट -गाइडतर्फे आयोजीत राष्ट्रीय मैदानी कराटे व तायक्वांदो स्पर्धेत महवीर इंग्लिश मेडीयम स्कूलच्या विद्यार्थांनी यश संपादन केले. या स्पर्धेत श्री महावीर स्कूलच्या सहा विद्यार्थ्यांनी भाग घेऊन यश मिळविले.त्यांची भोपाळ येथे होणा-या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. कीर्तेश पाटिल, सम्यक साळवे, मयूर पाटीदार, आकांक्षा पाटीदार,श्रृती जैन व अंशिका जैन यांनी सुवर्णपदक पटकावले. या विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक सुनिल गुरखा, रमेश जयस्वाल व हेमराज राजपूत यांचे मार्गदर्शक लाभले. संस्थेचे अध्यक्ष रमेशचंद जैन,उपाध्यक्ष विनय गांधी,सचिव पारस देसर्डा, हेमलाल गांधी, अनिल छाजेड, समिर जैन, चंदनमल जैन प्राचार्य ए. एम. पाटिल, उपप्राचार्य किशोर चौधरी आदींनी गौरव केला.