शहादा येथुन चोरीस गेलेली मोटार सायकल सापडली

0

शिरपूर । शहादा येथुन मार्च महिन्यात चोरीस गेलेली मोटार सायकल शिरपूरात येथील पोलिसांनी ताब्यात घेतली. कायदेशीर बाबीची पुर्तता करुन गाडी मुळ मालकास परत करण्यात आली. शिरपूरातील श्रीराम काँलनीत राहणारे विज शांतीलाल जैन हे त्यांच्या खाजगी कामासाठी 31मार्च रोजी शहादा येथे फॅशन प्लस मोटार सायकल (क्रमांक एमएच 39-जी 9123) घेऊन गेले होते. तेथे कोणीतरी अज्ञात चोरट्याने ती मोटार सायकल चोरून नेली होती. जैन यांनी शहादा पो.स्टे ला दिलेल्या तक्रारी वरुन गुन्हा दाखल करण्यात आला होता. ही घटना शिरपूर पोलिसांना देखील कळविण्यात आली होती. शिरपूर पोलिसांना आशीर्वाद हाँस्पिटल जवळ कोणीतरी एक मोटार सायकल लावुन गेले असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी ती मोटार सायकल ताब्यात घेतली. सदर मोटार सायकल शहादा येथील हवलदार प्राकाश तमखाने यांच्या ताब्यात दिली.