शहादा। शहरातील प्रेस मारुती परिसरातील कमानी जवळ विवाहितेस अपशब्द वापरत महिलेच्या पतीस बेदम मारहाण केली. ईमराण मेमन याने गरीब नवाज कोलनि शहादा येथिल 25 वर्षीय महिलेच्या पतिस फोनकरून शिवीगाळ केली होती.
या प्रकरणानंतर शुक्रवारी रात्री 8 वाजता महिला आपल्या पतीसोबत प्रेस मारूती मंदिराचा कमानी जवळ इमरान उमर मेमन, अशरद इकबाल मेमन, सरफराज इक्बाल मेमन, बाबु सोनी ऊर्फ वंदना बारी (सर्व राहणार नंदूरबार), अमोल रामचंद्र ठोंबरे (रा. प्रकाशा) यानी दोघांना मारहाण केली. यात इमरान मेमन याने लाकडी दांडा व लोखंडी पाईपच्या मदतीने पीडित महिलेच्या पतिस मारहाण करत महिलेला लज्जा येईल असे कृत्य केले. या दरम्यान अशरद मेमन, वंदना बारी व अमोल ठोंबरे यांनी पतिला हाताबुक्याने मारहाण केली. याबाबत महिलेल्या पीडित महिला हिने रात्रि पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. यात संशयित महिला आरोपी व सरफराज मेमन दोघेही फरार आहेत.