शहादा। येथील कुंज बिहारी प्रतिष्ठान ट्र्स्टतर्फे उत्तरमुखी हनुमान प्राणप्रतिष्ठा सोहळाचे आयोजन करण्यात आले आहे. शहरापासून जवळपास 7 कि.मी. अंतरावर असलेल्या सोनवद फाट्याजवळ कुंजप्रतिष्ठानतर्फे गोशाळा गेल्या तीन वर्षा पासुन सुरु आहे. याठिकाणी उत्तरमुखी हनुमान प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आयोजन कुंजबिहारी प्रतिष्ठानतर्फे करण्यात येवुन हा सोहळा तीन दिवस चालणार आहे. या सोहळ्यात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत ट्रस्टचे अध्यक्ष ह .भ. प खगेंद्र महाराज ,उपाध्यक्ष डॉ. योगेश चौधरी , सचिव मदन महाले सह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महिला वर्ग मोठ्याप्रमाणात उपस्थित होता.
तीन दिवस चालणार सोहळा
शोभायात्रा मिरवणुकीत भजनी मंडळाचा सुश्राव्य व भक्तीमय वाणीतुन भजन व किर्तन करत नाचत गाजत गोशाळेकडे नेण्यात आली. रात्री ह.भ. प. रामचंद्र महाराज मालपुरकर यांचे किर्तन आयोजित करण्यात आले होते. 8 वार ऑगस्ट मंगळवार रोजी सकाळपासुन मातृका पुजन,अग्निस्थापन ,मंडळ स्थापन, जलाधिवास आदि कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. तर सायंकाळी हरिपाठ व रात्री भजन कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. 9 ऑगस्ट बुधवार रोजी मुर्तिप्रतिष्ठा,पुर्णाहुती,महाआरती व भंडार्यांचे आयोजन करण्यात आले असुन आचार्य वे.मु. द्वारकेश खगेंद्र बुवा यांचा उपस्थितीत मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. डॉ. योगेश चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार कुंजबिहारी ट्रस्टच्या वतीने सलग तीन वर्षापासून गोशाळा व गौसेवा अखंडपणे सुरू आहे.