शहादा। ये थे एकूण 52 गणेश मंडळाची नोंद झाल्याची माहिती पोलीसांकडुन मिळाली आहे. एका दिवसावर गणेशोत्सव येवुन ठेपल्याने शहादा शहरातील जवळपास मोठे गणेश मंडळानी भव्य आरास आयोजन केले आहे. गणेश भक्तांनी केवळ आरासावरच भर दिला नाही तर गणेशाचा आगमनाची देखील भव्य तयारी केली आहे. शिवाय गणेश मुर्ती मोठ्या आणण्यावर भर दिला आहे. शहाद्यातील बजरंग मंडळातर्फे आणण्यात आलेली कटप्पा बाहुबलीच्या रूपातील गणेश मुर्ती पहाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी जमली होती.
क्रांती मित्र मंडळातर्फे मिरवणूक
शहादा शहरातील नामांकित अश्या क्रांती मित्र मंडळातर्फे आकर्षक व भव्य श्री गणेश मुर्तीचे राष्ट्रीय संदेश जय जवान,जय किसान यावर आधारित भारतीय सेनेचे तिन्ही थलसेना,वायुसेना व नौसेना सैनिकांचे जीवंत प्रतिके आणि किसानांचे प्रतिक म्हणजे बैलगाडी व बैलगाडी हाकणारे शेतकरी हे होते. ही आगमन मिरवणूक श्री.सप्तश्रृंगी निवासीनी देवी मंदिर दोंडाईचा रोड येथून अॅड. राजेशभाऊ कुलकर्णी व प्रविणा राजेश कुलकर्णी यांच्याहस्ते मुर्ती पुजन व आरती करून सुरू करण्यात आली.
यांची होती उपस्थिती
या मिरवणूकीत मंडळाचे कार्यकर्ते राज बच्छाव, सिध्देश बडोदेकर यांच्या संकल्पनेने व गौरीशंकर बोरसे, विठ्ठल बच्छाव, प्रा.अनिल साळुंके , नगिन गुरव , क्रांती मित्रमंडळाचे अध्यक्ष दिपक ईशी, उपाध्यक्ष राहुल अमळथेकर यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आली. जि.प.सदस्य अभिजीत पाटील, नगरसेवक संजय साठे, नगरसेवक संदिप पाटील, संतोष वाल्हे, संजय भावसार, रविंद्रभाऊ बुनकर, राजेंद्रभाऊ पाटील, सुरजितभैय्या राजपाल,डॉ.निलेशजी लडडा आदी उपस्थित होते.