शहादा येथे चार ठिकाणी घरफोडी

0

20 तोळे सोने चोरीला; पोलीसांची घटनास्थळी धाव
शहादा – शहरातील दोन कॉलन्यातील प्रत्येकी दोन ठिकाणी घरफोडी केल्याचे आज सकाळी उघडकीस आले आहे. यात घरफोडीत एका घरातून तब्बल 20 तोळे सोने गेल्याचे समोर आले आहे. या घटनेबाबत शहरात एकच खळबळ उडाली आहे. घटनास्थळी पोलीसांनी धाव घेतली असून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू आहे.

मिळालेल्या सुत्रानुसार, शहरातील शिव सुंदरम नगरातील रहिवाशी माया भरत पाटील यांच्या बंद घरात बुधवारी मध्‍यरात्री अज्ञात चोरट्यांची घरफोडी करून तब्बत 20 तोळे सोने असे एकूण 6 लाख 40 हजार रूपयांचा ऐवज लंपास चोरी केला आहे. त्यानंतर त्याच भागातील मागच्या गल्लीत राहणाऱ्या एक घरही फोडले आहे. अज्ञात चोरट्यांनी चोरी करण्याचा मोर्चा इथवरच न थांबता त्यांना तुलशी नगर परीसरातदेखील दोन बंद घरे फोडल्याच प्रकार समोर आला आहे. चारही घटनास्थळी पोलीसांनी धाव घेतली असून किती रूपयांचा ऐवज चोरी गेला आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.