शहादा येथे पाच दिवसीय शिवपुराण महिमेचे आयोजन

0

शहादा । येथील अन्नपूर्णा लॉनमध्ये अन्नपूर्णा मित्रमंडळातर्फे शिवपुराणाचे आयोजन करण्यात आले आहे. ह.भ.प. खगेंद्र महाराज ब्राह्मणपुरीकर यांच्या सुश्राव्य वाणीतुन पाच दिवसात शिवपुराण महिमेचे आयोजन करण्यात आले. यावेळी भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित रहातात. महाराजांनी सांगितले की भक्तीच्या मार्ग हा महत्वाचा आहे. भक्तीमध्ये मोठी ताकद व शक्ती असते. याचा महाराजांनी सदोहरण महत्व पटवून दिले. शिव पुराण कथा 28 जुलैपासुन सुरु झाली सुरुवातीला गणपती मंदिरापासुन भव्य शोभायात्रा काढण्यात आली. रोज 2 ते 5 यावेळेत शिवपुराण कथा होणार असुन दि 1 ऑगस्टला त्याची सांगता होणार आहे. तरी सर्व भाविकांनी ह्या कथेचा लाभ घ्यावा असे आवाहन अन्नपूर्णा मित्र मंडळाने केले आहे.