शहादा । व्हॉलंटरी महिला मंडळ शाळा व कनिष्ठ महाविद्यालयात तंबाखु मुक्त शाळा व व्यसन मुक्ती दिंडी काढण्यात आली. प्रारंभी विविध तंबाखुयुक्त पदार्थांची होळी करून शाळा परिसरातून व्यसन मुक्ती दिंडी काढण्यात आली. यावेळी अॅड. राजेश कुलकर्णी, प्रभाकर उमराव, प्रविण कुलकर्णी, मुख्याध्यापीका ताराबाई बेलदार आदी मान्यवर उपस्थित होते. व्यसनामुळे अनेकांचे जिवन उद्ध्वस्त होत असल्याने शाळा व परिसरात व्यसन मुक्त अभियान राबविण्यात आले.
व्यसनमुक्तीबाबत मार्गदर्शन
शाळा परीसरात विद्यार्थ्यांनी व्यसन मुक्ती दिंडी काढली त्यात विविध सामाजीक संदेश देणारे बॅनर विद्यार्थ्यांनी तयार केले होते. यावेळी अॅड. कुलकर्णी यांनी व्यसनमुक्तीची गरज सांगितली. सुत्रसंचालन ललिता राठोड यांनी तर आभार सुनिता पाटील यांनी मानले. यशस्वीतेसाठी प्रतिभा बोरसे, मीना ठाकूर, भावना जव्हेरी, पुष्पा पाटील, अर्चना पाटील, विया पाटील, वृक्षाली भावसार, विद्या बोरसे, मनिषा पाटील यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.