शहादा येथे विनाअनुदानीत शाळेत प्रवेशासाठी जोरदार प्रसार प्रचार

0

शहादा । शहरात सध्या विनाअनुदानित इंग्रजी शाळाकडून गल्ली बोळात रिक्षाफिरवून ध्वनीक्षेपवरुन विद्यार्थीचा प्रवेशाबाबत प्रचार व प्रसार केला जात आहे. त्यामुळे पालकवर्ग आपल्या मुलाला कोणत्या शाळेत दाखल करावे या विचारात पडला आहे. शहरात दहापेक्षा अधिक इंग्रजी माध्यमाच्या शाळा झाल्या आहेत. त्यामुळे नवीन शाळांनी आपल्या शाळेत विध्यार्थ्यांनी प्रवेशद्वार घ्यावा म्हणुन वेगवेगळे प्रयोग केले जातात. त्यात शहरातील चौकाचौकात शाळेच्या दर्जा व शिक्षण सुविधाबाबत माहिती देणारे फलक लावण्यात आले आहेत. सुशिक्षित तरुणांना लावून पत्रके वाटप केली जातात रिक्षा फिरवून प्रवेशाबाबत आव्हान केले जात आहे.

इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेशासाठी पालकांमध्ये संभ्रम
दिवसेंदिवस इंग्रजी माध्यमाच्या शाळाच्या संख्या वाढल्याने विद्यार्थी प्रवेशाबाबत स्पर्धा वाढली आहे. अनुदानित शाळामध्ये विद्यार्थी संखेच्या प्रश्न निर्माण होणार आहे. शिक्षकाना सुटीत विध्यार्थ्यांचा शोधासाठी भटकावे लागणार आहे. पालकांना वेगवेगळ्या प्रकारचे अमीष दाखवले जात आहे. मोफत गणवेश मोफत बस पासेस याचा समावेश आहे. शहरातील लोकसंख्या बघता इंग्रजी माध्यमांची शाळांची संख्या जास्त झाल्याने शिक्षणाचा दर्जाबाबत प्रश्नांचीचिन्ह निर्माण झाले आहे. इंग्रजी माध्यमाच्या शाळांच्या व्यवस्थापनाकडुन विध्यार्थाना घरपोच ने आण करण्यासाठी बससेवा आकर्षक शाळेच्या गणवेश पुस्तके माफक फी सोयी सुविधा तसेच ग्रामीण भागातही खाजगी बसेस देण्याचे आश्वासन दिले जात आहे. त्यामुळे सर्वसामान्य पालक आपल्या मुलाला कोणत्या शाळेत टाकावे ह्या सभ्रमात आहे शहरात सर्वत्र वेगवेगळ्या शाळेच्या प्रवेशाबाबत फलक लावलेली दिसत आहेत. रिक्षामार्फत ध्वनीक्षेपावरुन प्रचार केला जात आहे. माहिती पुस्तिका वेगवेगळ्या छायाचित्राच्यी वाटप केली जात आहे.