शहादा येथे वीजधारकांसाठी जनता दरबारचे आयोजन

0

शहादा। वीज बिलात भरमसाठ वाढ होवून येणे, जीर्ण झालेले पोल रोहित्रसाठी, भारनियमनयास महावितरण वीज कंपनीच्या समस्यांना न्याय देण्यासाठी लोकप्रतिनिधी, महावितरण कंपनीचे अधिकारी तसेच ग्राहक यांच्यात समन्वय साधत मार्ग काढण्यासाठी जनता दरबारचे आयोजन झाले. यावेळी अनेक तक्रारींचे जागेवर निवारण झाल्याने ग्राहकांनी समाधान व्यक्त केले असल्याचे शहादा तळोदा मतदार संघाचे आमदार उदेसिंग पाडवी यांनी म्हटले आहे. महावितरण वीज कंपनी शहादा विभाग अंतर्गत आज येथील लोकमान्य टिळक टाऊन हॉल येथे आमदार उदेसिंग पाडवी यांच्या उपस्थितीत जनता दरबारचे आयोजन झाले.

आमदारांपुढे वाचला तक्रारीचा पाढा
महावितरण वीज कामोनिच्या समस्या कमी न होणार्‍या आहेत असे असले तरी त्याच्यातून मार्ग काढण्यासाठी जनता दरबार हे वीज ग्राहकांचे हक्काचे व्यासपीठ आहे. तक्रार मांडतांना समस्या कशा सुटतील याचा विचार व्हावा, आक्रमक होवून समस्या सुटण्यापेक्षा वाढत जातील, असे आ. पाडवी यांनी म्हटले आहे. महावितरण वीज कंपनीच्या घोटाळी, राणीपूर, टवाळीसह काही ग्राम पंचायतीने नवीन विद्युत पोल रोहीत्रांची मागणी गेल्या दोन वर्षापासून केलेली आहे. मात्र अद्याप काही माहिती मिळाली नाही, अशी तक्रार आहे. गत वर्षातील आर्थिक बजेटमध्ये काम पूर्ण होवू शकत नव्हते. येत्या बजेटमध्ये निधी टाकून काम पूर्ण करणार. म्हसावद येथील मदन उखा पाटील याने म्हटले की, घरात चार लाईट एक पंखा असतांना महिन्याकाठी चक्क 17 हजारांचे बिल मिळाले आहे अनेक तक्रारदार यांनी रोहीत्रांची मागणी, जीर्ण झालेले पोल, वायर टाकणे या समस्यांचा पाढा वाचला आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मगरे यांनी तर आभार आर.एल.मोरे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सहायक अभियंता किशोर गिरासे, ईश्वर तायडे, धीरज यादव अविनाश पाटील, यासह अधिकारी कर्मचारी यांनी जनता दरबार यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.