शहादा येथे संतसेना महाराज पुण्यतिथीनिमित्त मिरवणूक

0

शहादा। येथे संतसेना महाराज यांचा पुण्यतिथी निमित्त भव्य मिरवणुक काढण्यात आली. सर्वप्रथम संतसेना पुण्यतिथी समितीच्यावतीने मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. श्री संतसेना चौक येथे श्री संतसेना महाराजांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले व रिद्दिका अनिल सोलंकी हीने आपल्या सुमधुर वाणीने गीत म्हटले. यावेळी समाज अध्यक्ष उद्धव जांभळे, समाजाचे माजी अध्यक्ष अशोक सोनवणे, नाभिक समाजाचे माजी विभागीय अध्यक्ष जगन्नाथ रावुत आदी मान्यवर उपस्थित होते.

मिरवणुकीत समाजबांधवांचा सहभाग
समाजातील काही तरुण व्यसनाचा आहारी गेल्याने अनेक दुखद घटनाना समोरे जावे लागते म्हणून तरुणांनी व्यसनापासुन लांब रहावे व व्यसनमुक्त आयुष्य जगावे असे आवाहन यावेळी करण्यात आले. मिरवणूक संतसेना चौक , गांधी चौक सरदार पटेल चौक होत गांधी नगर साईबाबा नगर रामदेवबा नगर या मार्गाने काढण्यात आली. मिरवणुकीत समाज बांधवासह महिला भगीनींनीही मोठ्याप्रमाणावर सहभाग झाल्या होत्या. समारोपाच्या वेळी सत्यनारायण व स्नेह भोजन देण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अजय पवार यानी तर आभार प्रा अनिल साळुंके यानी मानले. यशस्वीतेसाठी हेमराज पवार ,अर्जुन सोनवणे,निलेश जांभळे सुनिल बोरदे ,संजय सोनवणे ,मधुकर न्हावी, रविंद्र जाधव,संदिप कन्हैया, आदि नाभिक समाजातील तरुणांनी कामकाज पाहिले.