शहादा। येथील संत निरकारी मंडळ ग्रामीण रुग्णालयातर्फे झालेल्या रक्तदान शिबिरात 270 दात्यांनी रक्तदान केले आहे. अन्नपूर्णा लॉनमध्ये हे शिबिर झाले. यावेळी सत्संगही झाला.
शिबिराला जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी भेट दिली. यावेळी मोहनलाल आहुजा यांनी स्वच्छता, अध्यात्म, शिक्षण, संस्कार आदी विषयांवर मार्गदर्शन केले. तहसीलदार मनोज खैरनार, वाय.डी. पाटील, डॉ.उल्हास देवरे यांनी शिबिराला भेट दिली. शिबिराला वैद्यकीय अधिकारी डॉ.अशोक गोसावी, तालुका वैद्यकीय अधिकारी व्ही.बी.पाटील, डॉ.राजेंद्र पेंढारकर, डॉ.हार्दिक पटेल, डॉ.राकेश पाटील, डॉ.शशिकांत पाटील, डॉ.विनोद बाविस्कर, डॉ.भूषण पाटील, डॉ.जितेंद्र भंडारी, डॉ.श्याम ठाकूर, डॉ.उज्ज्वला भामरे, डॉ.सुनंदा बहरती, डॉ.सुप्रिया साळुंखे, डॉ.स्नेहल भावसार यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मोहन आहुजा, हिरालाल पाटील, संजय निकुंभे, पीतांबर चव्हाण, सनी जिसेन्जा, हरीश चिम्नानी, इंद्रकुमार बख्त्यापुरी, साहेबराव बाविस्कर, यांच्यासह शिरपूर, दोंडाईचा, नंदुरबार येथील कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले.