शहादा । शहराचा विचार केला तर शहाद्यात सर्वच बाजुंनी अतिक्रमणाचा विळखा घातला गेला आहे. डोंगरगावरोड, खेतीया रोड, दोंडाईचा रोड, भाजी मंडई पासून तर मनोरंजन वाडीपासून ते सराफा बाजाराकडे जातांना रस्त्याचा विचार केला तर रस्ताच सापडत नाही पायी चालतांना नागरिकांना मोठी कसरत करावी लागते. शहादा शहरातील अतिक्रमण हटविण्याची मागणी बहुजन समाज पक्षाचे विधानसभा प्रमुख गजानन साबळे यांनी लेखी निवेदनात दिली आहे.
अतिक्रमणधारकांना नोटीसा बजावूनही अतिक्रमण जैसे थे
निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, शहादा शहरातील अतिक्रमण दि. 29/1/2015 रोजी जिल्हाधिकारी, मुख्याधिकारी शहादा न.पा., सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच पोलीस अधीक्षक यांच्या उपस्थितीत काढण्यात आले होते. यानंतर 55 अतिक्रमणधारकांना नोटीसा बजाविण्यात आल्या. परंतु अतिक्रमण जैसे थे झाले आहे. आपण अतिक्रमण काढतांना कोणला सावत्रपणे वागणुक देऊ नये असे निवेदनात सांगण्यात आले आहे. दोन वर्षाअगोदर काढलेल्या अतिक्रमणाचा सर्व खर्च वाया गेला. पावसाळ्यापूर्वी अतिक्रमण काढावे जेणे करून रस्त्यावर चालणार्या नागरिकांचा अधिकार हिरावला जाणार नाही ह्याची दखल नगरपालिकेने घेणे गरजेचे आहे. नगरपालिकेचा दक्षिणेकडील अतिक्रमण कायमचे उठवून एकतर केले. शिवाजी महाराजांचा किंवा सहकारमहर्षी अण्णासाहेब पी.के. पाटील यांचा पुतळा बसवून अतिक्रमण होणार नाही व नागरिकांना एक सुटकेचा श्वास घेता येईल असे शहादा मतदार संघाचे विधानसभा अध्यक्ष गजानन साबळे यांनी निवेदनात म्हटले आहे. अतिक्रमण लवकरात लवकर हटवून कारवाई करण्याची मागणी देखील गजानन साबळे यांनी यावेळी केली.