शहादा शहरातील मुख्य रस्त्याची अवस्था दयनिय

0

मोठमोठ्या खड्ड्यांमुळे जीवीतास धोका

शहादा । शहरातील अत्यंत महत्वाचा प्रमुख मार्ग असलेल्या बसस्थानकापासून तर शासकीय विश्रामगृहापर्यंतच्या रस्त्याची दुर्दशा झाली आहे. शहरातील नागरिकांचा सर्वाधिक वापराचा हा रस्ता आहे. या रस्त्याने सतत येणे-जाणे होत असते. त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात समस्येला तोंड द्यावे लागत आहे. हा रस्ता खराब असल्याने नागरिक हैराण झाले आहे. यावरुन नगरपालिका प्रशासनाचा ढिसाळ कारभार पुन्हा एकदा समोर आले आहे. गेल्या अनेक दिवसापासून रस्ते दुरुस्तीचा सोंग नगरपालिकेकडून होत आहे. जुलैमध्ये खडी व मुरुम टाकण्यात आले होते. मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही, पुन्हा नगरपालिकेने रस्त्यावर माती टाकली. अद्यापही रस्त्याची दुरुस्ती झालेली नसल्याने रस्त्यावरुन वाहने चालविणे कठीण झाले आहे.

नगरपालिकेने लक्ष देण्याची मागणी
तशीच परिस्थिती डोंगरगाव रस्त्याला शारदा नगर परिसरातील रस्त्याची झालेली आहे. या रस्त्याच्या कामाचे टेंडर काढण्यात आले आहे. प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे अन्यथा अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. आनंद अ‍ॅग्रोपासुन शासकीय विश्रामगृहापर्यंत अशीच अवस्था आहे. पावसाळ्यानंतर कामाला सुरुवात होण्याची शख्यता आहे मात्र नगराध्यक्ष मोतीलाल पाटील बांधकाम विभाग, मुख्याधिकारी डॉ.सुधीर गवळी तसेच नगरसेवकांनी मतभेद विसरुन रस्त्याची तात्पुरती व्यवस्था करावी अशी मागणी होत आहे.