शहादा शहरातील स्वछतेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह

0

शहादा । नगरपालिकेत तीन स्वछता निरीक्षक आवश्यक असताना केवळ एकमेव स्वछता निरिक्षक असल्याने शहरातील स्वछतेचा बाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. अद्याप या गंभीर प्रश्नाबाबत जिल्हाधिकार्यानी गंभीर दखल घेतली नाही. नगरपालिकेत अनेक महत्वपुर्ण पदे रिक्त आहेत.पण सर्वात महत्वपुर्ण असलेल्या स्वछतेबाबत दुर्लक्ष होत आहे. गेल्या चाळीस वर्षापासुन स्वछता निरिक्षक म्हणुन एकमेव कर्मचारी नियुक्त आहे. आता स्वछता निरिक्षक म्हणुन आर. एम. चव्हाण कार्यरत आहेत. त्यानंतर दुसरे पद मंजुर झाले.स्वछता निरिक्षकाची नियुक्तीच झाली नाही.

70 हजारांवर लोकसंख्या
आज शहराची 70 हजारांवर लोकसंख्या बघता, वाढता विकास झाला आहे तीन स्वछता निरिक्षक आवश्यक आहेत. तिन अधिकार्‍यांची गरज असताना केवळ एक स्वछता निरिक्षक काम पहात आहे. म्हणुन कामाचा अतिरिक्त बोझा वाढतो. पर्यायाने एवढ्या मोठ्या शहरात काही भागाकडे दुर्लक्ष होते. विनाकारण नागरिकांचा रोष निर्माण होत असतो. शहतात जरी स्वछतेचा ठेका दिला असला तरी पण नियंत्रण व देखरेख स्वछता निरिक्षकाला करावी लगते. महत्वपुर्ण असलेला स्वछता विभाग शासनाने दुर्लक्षित केला आहे. अनेकवेळा नगरपालिकेने ठराव करुन जिल्हाधिकार्याकडे प्रस्ताव पाठविला आहे. पण अद्याप त्याचा विचार करण्यात आला नाही.

एक सहाय्यक मिळावा
जिल्हाधिकार्‍यांनी याची दखल घ्यावी अशी मागणी आहे. मी एकमेव अधिकारी असल्याने कामाचा ताण पडतो. शिवाय चार ते पाच वर्षात सेवा निवृत्त होणार आहे. शासनाने एक जरी सहाय्यक नियुक्त केल्यास माझा मार्गदर्शनाखाली अनुभव मिळेल शहराचा कामाची पुर्ण माहिती सहाय्यक अधिकार्‍यास मिळेल पालीका प्रशासनाचा भविष्यात ताण कमी होईल .
– आर. एम. चव्हाण, स्वछता निरिक्षक