शहादा शहरात अतिक्रमणावर नगरपालिकेचा हातोडा

0

शहादा। शहरात नगरपालिका प्रशासनातर्फे 7 ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजेनंतर जामामशीद चौक ते लालदास चौक पर्यंत मेनरोडवरील अनेक पक्के अतिक्रमण जेसीबीने काढण्यात आल्याने अतिक्रमण धारकामध्ये घबराट निर्माण झाली आहे. गेल्या तिन दिवसापूर्वी पुर्वसुचना न देता पालीका प्रशासनाने अतिक्रमण काढण्याचा प्रयत्न केला पण नागरीकांनी विरोध केला होता. शेवटी पक्के आहे ज्यानी बांधकाम केले होते त्यांना नोटीसा बजावल्या व आज स्वतः मुख्याधिकारी डॉ. सुधीर गवळी व कर्मचार्‍यांच्या पथकासह पोलिस बंदोबस्तात अतिक्रमण काढण्यात आले.

गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर केली कारवाई
जामा मशिद ते लालदास चौकपर्यंत रस्त्याचा दोन्ही बाजुने मोठ्या प्रमाणात पक्के ओट्याचे बांधकाम केल्याने रस्ता अरुंद झाला होता. नागरीकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. गणपती विसर्जन मिरवणूकीचा मार्ग आहे. आगामी येणारा गणेशोत्सव व रस्त्याचा कामाला सुरुवात करावयाची असल्यांने अतिक्रमण काढणे आवश्यक होते. अनेक व्यावसायिक दुकानदारांचे रहिवाशांचे पक्के ओट्याचे बांधकाम जेसिबी यंत्राणे काढुन उध्वस्त केलेत माहीती मिळविली असता दिडशे पर्यन्त ओट्याचे अतिक्रमण काढले आहे. पो.नि. शिवाजी बुधवत यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. गणेशोत्सवानंतर लालदास चौक ते आझाद चौक चार रस्ता ते जामा मशीद चौक शिवाय दोंडाईचा रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यात येणार आहे. आज रक्षाबंधनाचा सण असतांना नगरपालीका प्रशासनाने अतिक्रमण काढल्याने कौतुक केले जात आहे आज सर्वात जास्त अतिक्रमण तुप बाजार जवळ काढण्यात आले रस्ता पूर्णत: मोकळा करण्यात आला आहे. उशीरा सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत जामा मशीद जवळ अतिक्रमण काढण्याचे काम सुरु होते.