बामखेडा। शहादा तालुक्यातील अंकलेश्वर-बर्हाणपूर या राज्य महामार्गावरील शहादा ते शिरपूर अवैध प्रवासी वाहतूक होत आहे. या शहादा-शिरपूर दरम्यान शेकडो कालीपीली व तसेच वडाळी ते शिरपूर येथून जवळपास 30 च्या जवळपास टाटा मॅजिक या वाहनामधून देखील अवैध प्रवासी वाहतूक सुरळीतपणे केली जात आहे.
या महामार्गावर खुलेआम व सर्रासपणे अवैध वाहतूक होतेय. या महामार्गावरील वाहनामध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवून अवैध वाहतूक होत असून प्रवाशांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. या अवैध प्रवासी वाहतुकीमध्ये जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. या वाहतुकीमध्ये जीवितहानी झाली तर याला जबाबदार कोण? हा देखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित करीत आहे. अवैध प्रवास वाहतूक पोलीस प्रशासनाकडून बंद हेात नसेल तर हा पोलीस प्रशासनाचा नाकर्तेपणा म्हणावा नाहीतर काय? अवैध व्यवसाय बंद होणार तरी कसे? यामुळेच पोलीस प्रशासनाचा कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.