शहादा- शहर व तालुक्याच्या दृष्टीने विघातक कृत्य करणार्या व कायदा सुव्यवस्था बिघडविणारे शहादा नगर पालिकेचे माजी नगरसेवक महेमुद उर्फ मुन्ना अहमद शेख यांच्यासह तीन जणांना एक वर्षासाठी तर अन्य एकास दोन वर्षासाठी नंदुरबार जिल्ह्याून प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर यांनी हद्दपार करण्याचे आदेश काढल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. शेख यांच्यासह एमआयएम पक्षाच्या विद्यमान नगरसेविका यांचा मुलगा साजिद रहीम पिंजारी तसेच एमआयएम पक्षाच्या विद्यमान नगरसेविका व आरोग्य सभापती सायराबी लियाकत सैय्यद यांचा मुलगा मोहम्मद अली लियाकत अली सैय्यद तसेच आत्माराम मोतीराम शेंमळे (वाघोदा, ता.जि.नंदुरबार ह.मु. मलोणी ता. शहादा) यांचा हद्दपार करण्यात आले आहे. दरम्यान शेमळे यांना मात्र दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे.