शहाद्यातही आज एक कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळला

0

नंदुरबार जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या आठ
शहादा:येथे शुक्रवारी, 24 रोजी पुन्हा एक कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आला आहे. त्यामुळे रुग्णांची संख्या 8 झाली असून त्यातील एकाचा मृत्यू झाला आहे. शहादा येथे दोन दिवसांपुर्वी दोन कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले होते. त्यापैकी एकाचा बुधवारी रात्री मृत्यू झाला. दरम्यान, शुक्रवारी शहादा येथील 23 वर्षीय युवकाची कोवीड 19 चाचणीचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. हा युवक कोरोनाने मयत झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी दिली. या सोबतच जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या 8 झाली आहे. त्यातील एकाचा मृत्यू झाला आहे. नंदुरबारात 4, शहादा येथे 3 तर अक्कलकुवा येथे एक असे 8 रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले आहेत.