शहादा । आताचे युग हे फार जलद युग आहे. माणुस माणसापासुन व माणुसकीपासुन पोरका होत चालला आहे. कोणालाच कोणाकडे पहायला वेळ नाही. यासाठी संकल्प गृपच्या माध्यमातून वेगवेगळ्या संकल्पना राबविल्या जातात. त्याचाच हा एक चांगला प्रयत्न करण्याचा मानस संकल्प गृपचा माध्यमातून करतो आहोत असे प्रतिपादन संकल्प गृपचे डॉ. लक्ष्मण सोनार यांनी केले. ते अन्नपूर्णा लॉन येथे झालेल्या कार्यक्रमात बोलतांना होते. सोनार म्हणाले की नेत्रदान श्रेष्ठ दान आहे शिवाय नेत्रदाना विषयीच्या बर्याच संकल्पना आपल्या अपूर्ण आहेत.
आज भारतात 67 लाख लोकांना डोळ्यांची आवश्यकता आहे. वयाचा 8 ते 60 वर्षापर्यंतची व्यक्ती नेत्रदान करु शकते. ज्यांना मधुमेह आहे,चष्मा, रक्तदाब टि. बी. मोतीबिंदू शस्रक्रिया केली आहे अशी व्यक्ती नेत्रदान करु शकते. पुढे बोलताना डॉ. सोनार म्हणाले की, कर्करोग , रेबीज झालेले ,पाण्याने बुडुन मेलेली , कुष्टरोग झालेली व्यक्ती नेत्रदान करु शकत नाही. मेल्यानंतर 6 तासाच्या आत रोपन होणे गरजेचे असते. नेत्रदान केल्यानंतर आवश्यक ठिकाणी ठेवुन दिड महिन्याचा आत आत आम्ही गरजु व्यक्तींना हे डोळे बसविण्याचे काम करतो. ज्यांना नेत्रदान करायचे असेल त्यानी प्रार्थना हॉस्पिटल येथे संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.