शहाद्यातील समस्या कधी संपणार ?

0

शहादा । नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहर पुरस्कार प्राप्त कधी होणार का? या कडे शहर वासीयांचे लक्ष लागून आहे. शहादा पालिकेत आता सत्ता बदलली असुन सत्ताधारी नक्कीच शहराचा विकास करतील अशी आशा अजुनही शहादावासियांना आहे. सध्या शहादा शहर समस्यांच्या विळख्यात आहे. शहरात अनेक ञासदायक समस्या आहेत. माञ या समस्याकडे लक्ष द्यायला पालिकेला सध्या फुरसत नाही. शहरातील सगळ्यात ञासदायक समस्या-डोगरगाव रोडवरील रस्ता दुभाजकाची शहादा – डोगरगाव रस्ताची रूंदी खुपच कमी आहे. तरी सुद्धा या रस्त्याचे दुभाजीकरण करण्यात आले. रस्त्याच्या मधोमध चारी खोदुन रस्ता विभाजन करण्यात आले आहे. या रस्ता विभाजनामुळे रोजचे अपघाताला आमंत्रण होत आहे. याच रस्त्यावर दोन तीन वेळा मोठे अपघात झाले असून या अपघातमध्ये समोरच्या व्यक्तीला प्राणाला मुकावे लागले. तरीही पालिकेच्या दृष्टीला ही समस्या दिसत नाही. या रोडावर वाहतुकीचे प्रमाण जास्त आहे.

वाहनाची दिवसभर रस्त्यावर वर्दळ
मंदाणे, असलोद, डोगरगाव या मोठ्या गावी जाण्यासाठी याच रस्तावरून जावे लागते. म्हणून वाहनाची दिवसभर या रस्त्यावर वर्दळ असते. त्यात अधिक म्हणजे याच रस्तावर सकाळी व संध्याकाळी पायी चालणारी महिला व पुरूषांची संख्या जास्त असते. तसेच याच रस्तावरून आजी माजी नगरसेवक घरी जा ये करतात. मग यांच्या लक्ष्यात हि समस्या का आली नाही असाही सुर शहादावासियांच्या तोंडुन निघत आहे. वास्तविक रस्ता विभाजन चांगली गोष्ट आहे. पण या रस्त्याची रूंदी कमी होती. मग रस्ता विभाजनाला का विरोध केला नाहि. का कुठे मिलीभगत झाली. असाही सुर उमटत आहे. या रस्ताच्या एका बाजुला बीअँडसीचा पाट आहे. जर त्या पाटावर स्लॅब टाकला तर पादचारीना सोईस्कर होणार व काही अंशी अपघात कमी होणार आहे. सत्ताधारी व विरोधकांनी आपसातील मतभेद विसरून शहराचा विकासाचा ध्यास ठेवला तर नक्कीच शहर विकासाच्या पुर्वस्थितीत येईल असा सुर सध्या उमटत आहे.