शहाद्यात अवैध वाहतुकीचा प्रश्‍न बिकट

0

शहादा । शहरात अवैधरित्या वाहतूक करणार्‍या वाहनानी व लोटगाड्यानी रस्ता काबीज केल्याने रहदारीची गंबीर समस्या झाल्याने पोलीस प्रशासनाने हा प्रश्‍न गांभीर्याने सोडवावा, अशी मागणी जोर धरु लागली आहे. 40 वर्षापासून हा प्रश्‍न कायम आहे. त्यावर कोणताही तोडगा अद्याप निघाला नाही. उपाययोजना नसल्याने हा प्रश्‍न बिकट बनला आहे. जैसे थे झाली आहे. त्यामुळे प्रशासनानेक याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.

वाहनचालकांना अडचणी
प्रमुख रस्त्यावर सरळ हाथगाड्यावाल्यांनी अतिक्रमण केले. हाथगाड्या अवैध प्रवासी वाहतूक करणार्‍या गाड्या त्यावर बेशिस्त पणे खाजगी वाहने भर रस्त्यावर लावले जातात बसस्थानक परिसर डॉ. आंबेडकर पुतळा ते चार रस्त्यापर्यंत मोटर सायकल चालविणे देखील कठीण होते. दिवसे दिवस हा प्रश्‍न वाढतच चालला आहे पोलीस प्रशासनाने कार्यवाही करावी अशी मागणी आहे

नावालाच कारवाई
केेवळ नावाला कारवाही होते. केवळ तत्कालीन पोलीस निरीक्षक काटकर यांनी रहदारीचा प्रश्‍न मिटविण्याचा चांगला प्रयत्न केला होता. ज्यामुळे रहदारी मोकळी होवुन अवैध वाहतुकीला पायबंद लागला होता. अतिक्रमण काढल्यानंतर डोंगरगाव रोड रस्त्यावर वाहतूक नियंत्रक पोलीस कार्यालयासमोर रोज पहाटे पासून तर रात्रीपर्यंत अवैध वाहतूक करणार्‍या गाड्यांची रांग लागलेली असते.

पोलिसांचे आश्‍वासन
सकाळपासून बसस्थानक परिसरात रस्त्यावर अवैध प्रवासी वाहतूक करणार्‍या गाड्या थांबतात रस्त्यावरच प्रवासी भरले जातात त्रामुळे अन्र वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. शांतता कमिटीत सदस्यानी, सामाजिक कार्यकर्त्यांनी, लोकप्रतिनिधींनी उपविभागीय पोलीस अधिकार्‍रांजवळ योजनांची मागणी केली. उपविभागीय पोलीस अधिकारी एम. बी. पाटील यांनी रहदारीचा प्रश्‍न मिटविला जाइल असे आश्‍वासन दिले.