शहादा –शहरात पोलीसांनी ९९ हजार ५०० रुपयांचा नकली नोटा जप्त केल्याने खळबळ उडाली आहे. बागवान गल्लीतील एका घरावर छापा टाकुन पोलिसांनी ही कारवाई केली. नकली नोटा आणणाऱ्या आरोपींचा शोध पोलीस घेत आहे. या प्रकरणी एका आरोपीस पोलीसांनी अटक केली आहे.
बागवान गल्लीत एका घरात काहीनी नकली नोटा आणल्या आहेत अशी गुप्त माहिती पोलीसांना मिळाल्यावर काल शनिवारी मध्यरात्री पोलीस निरिक्षक संजय शुक्ल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक बागुल यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसह बागवान गल्लीत छापा टाकुन शकुर अय्युब मन्यार यास ताब्यात घेतले. त्याच्याकडील ९९ हजार ५०० रुपयांचा नकली नोटा जप्त करण्यात आल्या. आरोपींविरोधात कलम ४८९ (अ ) (ब) (क) ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. अन्य दुसरा आरोपी जावेद शे खलील रा.अंधेरी (मुंबई) याच्या शोध पोलीस घेत आहे. या कारवाईने नकली नोटाचा व्यवसाय करणाऱ्याची टोळी बाहेर निघण्याची शक्यता आहे.