35 जुगारी जाळ्यात ; साडेआठ लाखांची रोकड जप्त
शहादा- शहरातील नागराज कॉलनीत सुरू असलेल्या एका मोठ्या ऑनलाईन जुगार अड्ड्यावर नाशिकच्या पथकाने धाड टाकून 35 जणांना ताब्यात घेतल्याने अवैध धंदे चालकांमध्ये मोठी खळबळ उडाली. संशयीतांकडून सुमारे आठ लाख 39 हजार रोख व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईने प्रचंड खळबळ उडाली आहे. नाशिकच्या पोलीस पथकाने धाड टाकून कारवाई केल्यानंतर शहादा व नंदुरबार पोलिसांच्या भूमिकेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.