शहादा । उत्तर कार्यात महाराज व संत येतात एवढी कलाल समाजाची महती आहे असे प्रतिपादन विश्वनाथ कलाल यानी शहादा येथील कलाल समाजाचा सष्ठीचा कार्यक्रमात केले. शहादा कलाल समाजातर्फे एकनाथ षष्ठीचा कार्यक्रमाचे आयोजन नुकतेच करण्यात आले त्यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.गणेश सोनवणे, महिला कलाल समाज अध्यक्ष डॉ. संगिता कलाल , उत्तर महाराष्ट्र कलाल समाज अध्यक्ष विश्वनाथ कलाल, तळोदा कलाल समाजाचे माजी उपाध्यक्ष नारायण कलाल , रमेश कलाल , वसंत कलाल ,वसंत बागुल सह मान्यवर उपस्थित होते.
संस्कार हाच मनुष्याचा दागिना
विश्वनाथ कलाल म्हणाले की, कलाल समाज हा सारा समाज माझा नातेवाईक आहे. समाजातील स्रीयानी उंबरठा ओलांडला आहे व समाजाची प्रगती मोठ्या प्रमाणावर झाली आहे. प्रगती करतानांच संस्कार हाच मनुष्याचा दागिना आहे व संस्कार जपला तर घर , घरानंतर समाज संस्कारक्षम होतो. मी शहाद्यात आलो याचे कारण म्हणजे समाज दर्शन घेण्यासाठी आलो आशिर्वाद देण्यासाठी आलो आहे . नाथसष्ठी सर्वात अगोदर तळोद्यात करण्यात आली. यावेळी नारायण कलाल , संगिता कलाल व प्रा. गणेश सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केली. सुरुवातील संत एकनाथ महाराजांचा पुतळ्याचे व सहस्रार्जुन चा प्रतिमेचे पुजन करुन दिपप्रज्वलन करण्यात आले. नंतर योजना जावरे यांनी स्वागत गीत म्हटले. याच वेळी चि. मल्हार कलाल याने पक्षासाठी पाणपोई तयार केली. त्याचे देखील उद्घाटन मान्यवरांच्या हाताने करण्यात आले. सूत्रसंचालन नयना कलाल यानी तर आभार राकेश कलाल यांनी मानले.