शहादा । येथे गुरुपोर्णिमानिमीत्ताने स्वामी समर्थ केंद्र व अनरद टेकडी जवळील रुहानी सत्संग मानवकेंद्रात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील स्वामी समर्थ केंद्रात दि. 9 जुलै रोजी गुरुपोर्णिमानिमीत्त सकाळी साडेपाच वाजता षोडशोपचार पुजा करण्यात आली. त्यानंतर सकाळी 8 वाजता आरती झाली व सामूहिक स्वामी चरित्र वाचन झाले त्यात साधारणतः दीडशे स्री पुरुषांनी सहभाग नोंदविला. दिवसभर भक्तांची गर्दी सुरु होती. गुरुपोर्णिमा निमीत्त केंद्रात महाराजांचा मुर्तीची पुजा करुन आशिर्वाद घेत होते.शहरापासून चार कि. मी. अंतरावर असलेल्या अनरद टेकडी जवळील रुहाणी सत्संग मानव केंद्रात सत्संग व लंगर सह नामदानाचा कार्यक्रम झाला. मानवकेंद्रात शेकडो भक्त उपस्थित होते. भक्तांनी संत ठाकुर सिह महाराज यांचा प्रतिमेचे पुजन करुन आशिर्वाद घेतले. दिवसभर सत्संगाचा कार्यक्रम झाला.ग्रामीण भागातील भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेठ व्ही.के.शहा आवारात स्वाधाय परिवारातर्फे कार्यक्रमाचे आयोजन केले होते.