शहादा- शहरासह राज्याभरात दहावीची परिक्षा सुरु आहे. यात मंगळवारी शहाद्यात इंग्रजीचा पेपर फुटल्याची धक्कादायक घटना समोर आली. विशेष म्हणजे पेपर केंद्राबाहेर येवून प्रश्नपत्रिकेची झेरॉक्स काढून दुकानदार विक्री करत होता. याप्रकरणी पोलिसांनी संबंधित दुकानदारांसह दोन जणांन रंगेहाथ अटक करुन कारवाई केली आहे.
शहरातील केंद्रावर 5 रोजी सकाळी 11 वाजता इंग्रजी विषयाची परिक्षा होती. यादरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोरील इकरा झेरॉक्स या दुकानात इंग्रजीच्या पेपरच्या झेरॉक्स प्रति दुकानदाराकडून लोकांना विकल्या जात असल्याची माहिती पोलीस निरिक्षक संजय शुक्ल यांना मिळाली. त्यांनी बी.डी.शिंदे, , हेड कॉन्स्टेबल मनोज सरकार, जलाल शेख यांच्यासह दुपारी 12.50 वाजता दुकानावर छापा टाकला. यात फरीद मुख्तार बेलदार रा. गरीब नवाज कॉलनी, संदीप एकनाथ कोळी रा. पाडळदा यांच्याकडे पेपरच्या झेरॉक्स मिळून आल्या. पोलिसांनी शहाद पोलिसात विरोधात गुन्हा दाखल केला असून दोघांना ताब्यात घेतले आहे. झेरॉक्स मशीन सिल करण्यात आले आहे.
Next Post