शहादा । येथील वसंतराव शैक्षणिक संकुलातील समर्थ सभागृहात तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांना संगणीकृत मशीन बाबत मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या उपस्थितीत आज बैठक आयोजित केली होती. याप्रसंगी पुरवठा अधिकारी विजय भंगारे, प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर, तहसीलदार मनोज खैरनार, नायब तहसीलदार व पुरवठा अधिकारी डॉ. उल्हास देवरे उपस्थित होते. गेल्या तीन महिन्यापूर्वी तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांना धान्य विक्रीसाठी व व्यवहारासाठी संगणीकृत यंत्रे दिली होती. पं यंत्रांमध्ये बिघाड असल्याने ते कुचकामी ठरले आहेत.
यंत्रे करण्यात आली जमा
शेवटी पुन्हा जैसे थे स्वस्त धान्य दुकानदारांनी आपापल्या पद्धतीने रजिष्टर मध्ये नोंद करून ग्राहकांना धान्य वाटप करत होते. तालुक्यात एकूण 217 स्वस्त धान्य दुकानदार असून केवळ प्रायोगिक तत्वावर 100 दुकानदारांना यंत्र दिले होते. या यंत्रावर ग्राहकांचा अंगठा ठेवून व्यवहार करणे बंधनकारक होते. पण या यंत्रामध्ये मोठ्या प्रमाणात चुका होत होत्या. चुकीची माहिती निदर्शनास येत होती. स्वस्त धान्य दुकानदारांनी तक्रारी केल्या होत्या. त्याची दाखल घेवून आज रोजी सर्व यंत्रे जमा करण्यात आलीत.
खंडित विद्युतपुरवठ्याने यंत्रे बिनकामी
ग्रामीण भागात विद्युत पुरवठा खंडित होणे, इंटरनेट सेवा उपलब्ध नसणे या तक्रारी होत्या. इंटरनेट सेवा उपलब्ध नसल्याने यंत्राचा उपयोग शून्य होता. ज्या कंपनीचे यंत्रे दुकानदारांना देण्यात आली ते चागल्या दर्जाचे नव्हते. जिल्हाधिकारी डॉ. कलशेट्टी यांनी बोलतांना स्वस्त धान्य दुकानदारांनी नागरिकांना चागली सेवा द्यावी. ग्रामीण भागातत आपण दुवा म्हणून काम करावे, समस्या तक्रारी असतील त्या बाबत प्रशासनामार्फत त्या सोडवल्या जातील यंत्रांचा बाबतीत चौकशी होईल असे आश्वासन दिले.
यंत्र हाताळतांना काळजी घ्या
नवीन यंत्रे उपलब्ध झाल्यास चागल्या रीतीने यंत्रे हाताळा असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कलशेट्टी यांनी केले. नंतर स्वस्त धान्य दुकानदारांच्या तक्रारी एकूण घेतल्या द्वारपोच स्वस्त धान्य योजना, हमाली सह यंत्र हाताळतांना कोणती काळजी घ्यावी याबाबतीत माहिती देण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नायब तहसीलदार डॉ. उल्हास देवरे, यांनी केले. बैठकीला तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार उपस्थित होते.