शहाद्यात जुगाराचा डाव उधळला : 15 जुगारी पोलिसांच्या ताब्यात

0

साडेसहा लाखांची रोकड जप्त : अवैध व्यावसायीकांमध्ये खळबळ

शहादा- शहरातील शिरुड रस्त्यावर आकाश हॉटेलमागे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर गुरूवारी रात्री पोलिसांनी धाड टाकून जुगार खेळणार्‍या 15 जणांसह 18 आरोपींना अटक करुन सहा लाख 46 हजार रुपये जप्त केले. या घटनेने शहरातील अवैध व्यवसायीकांमध्ये घबराट पसरली.
शांतीलाल मोरे व धर्मा नाईक व छोटु भोई (रा.शहादा) यांच्या शिरूड चौफुलीवर अवैधरीत्या सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर 9 ऑगस्टच्या रात्री 11 वाजेच्या सुमारास धाड टाकुन शांतीलाल मोरेसह 18 आरोपींना अटक करण्यात आली तर घटनास्थळावरून सहा लाख 46 हजार रुपयांच्या ऐवजांसह जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले.

या जुगार्‍यांना केली अटक
आकाश हॉटेलमागे बेकायदेशीररीत्या जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. 9 ऑगस्ट रोजी रात्री सापळा रचुन धाड टाकण्यात आल्यानंतर जुगार खेळणार्‍या आसीफ मेमन, प्रवीण चौधरी, विक्रम चौरे, एकनाथ खरात, मधुकर तावडे, विकास चौधरी, युवराज सोनवणे, भरत खैरनार, शरद पाटील (रा.शहादा), गणेश भोई, आकाश भोई, अतुल भोई, सुनील भोई (रा.पिंगाणे), मनोज गिरासे व तुळशीराम घोडराज (दोन्ही रा.जावदा) अशा एकूण 15 आरोपींना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या विरोधात शहादा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. रात्री दोन वाजेपर्यंत काही बड्या मंडळीनी प्रकरण मिटविण्यासाठी प्रयत्न केला पण त्यात यश आले नाही . हवालदार छोटु शिरसाठ यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल झाला.

यांनी केली कारवाई
पोलीस उपअधीक्षक एम.बी.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अमृत पाटील, हवालदार छोटुलाल शिरसाठ, हवालदार राजेंद्र जाधव, एम.ए.वळवी, नाईक विशाल सोनवणे, कॉन्स्टेबल महेंद्र शिंदे, विश्वास साळुंके, एसएसआय एन.एस.वारूळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.