शहादा । शहरातील तहसिल कार्यालयासमोर महाराष्ट्र शासनाने शेतकर्यांना संपुर्ण कर्जमाफी दिल्याने भाजपा तालुका व शहर कार्यकारणीतर्फे जल्लोष साजरा करण्यात आला. गेल्या आठवड्यापासून विविध शेतकरी संघट्ना व महाराष्ट्रातील शेतकर्यानी जो संप पुकारला होता, त्यात शेतकर्यांना रविवारी यश आले. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एतिहासीक निर्णय घेत महाराष्ट्रातील तमाम शेतकरी वर्गाचे कर्ज माफ केले. शेतकरी हा अत्यंत अल्प भुधारक (5 एकर खालील शेती), अल्प भुधारक (12 एकर खालील शेती) त्यांचा सातबारा हा आजच कोरा झाला आहे. तर 12 एकर व त्यापुढील शेतकर्यांचा सातबारा कोरा करण्याच्या निर्णय हा येत्या 26 जुलै रोजी घेण्यात येणार असल्याची माहिती ओबीसी मोर्चा शहररध्यक्ष हेमराज पवार यानी दिली. शेतकर्यांचा सात बारा कोरा झाल्याने शहादा तालुका व शहर भाजपा कार्यकारणी व सदस्यांनी शहरातील तहसील कार्यालय जवळील आंबेडकर पुतळ्याजवळ फटाके फोडून जल्लोष साजरा केला.
मुख्यमंत्र्याचे केले अभिनंदन
यावेळी प्रतिक्रीया देतांना तालुकाध्यक्ष किशोर पाटील सांगितले की, सर्वप्रथम मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन मुख्यमंत्री शेतकरी हिताचे निर्णय घेतात भाजपा सरकार संपुर्णपणे शेतकर्यांच्या पाठीशी आहे. तर शहराध्यक्ष जितेंद्र जमदाळे बोलतांना सांगितले की, हा निर्णय शेतकर्यांना दिलासा देणारा निर्णय आहे. विरोधी पक्षांनी शेतकर्यांना जे चुकीचे मार्गदर्शन केले त्याने त्यांचेच पित्तळ उघडे पडले. यावेळी शहादा तालुकाध्यक्ष डॉ. किशोर पाटील, शहराध्यक्ष जितेंद्र जमदाळे, ता.उपाध्यक्ष सचिन पाटिल, जि. प. सदस्य सुनिल चव्हाण, नगरसेवक संजय साठे, प्रशांत निकम, शहर महामंत्री हितेश वर्मा, ता.सरचिटणीस मनोज चौधरी, ओबीसी जिल्हासरचिटणिस चंद्रकांत पाटील,ख ओबीसी मोर्चा शहराध्यक्ष हेमराज पवार, उपाध्यक्ष अक्षय अमृतकर, पंकज सोनार, उमेश पाटील, कमलेशा जहांगीड, अबरार शहा, बाळा वळवी, दिनेश खंडेलवाल, के.एम.पाटील यांच्यासह आदी कार्यकर्ते उपस्थित होते.