शहाद्यात धाडसी चोरी; दीड लाखांचा ऐवज लंपास

0

शहादा । शहाद्यात मकरसंक्रांतीचे औचित्य साधुन चोरट्यांनी सुवर्ण नगरीत भाड्याच्या घरात राहणार्‍या व्यक्तीच्या घरात धाडसी घरफोडी केल्याचे रविवारी रात्री 9.30 वाजेच्या सुमारास समोर आले असून परीसरात रहिवाश्यामध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. याबाबत अज्ञात चोरट्यांच्या विरोधात शहादा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील सुवर्ण नगरीत भाड्याच्या घरात राहणारे भुपेंद्र अरूण जोशी हे मकरसंक्रांतीच्या निमित्ताने घराला कुलूप लावून आपल्या गावी अमळनेरला कुटूंबासह शनिवारी सकाळी गेले. गावाला गेल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करून घरातील सामानाची अस्तव्यस्त करत घरातील 20 हजार रूपयांची मंगलपोत, 20-20 ग्रॅमचे दोन हार, 10 ग्रॅम चांदीची मुर्ती आणि 9 हजार रूपये रोख असे एकुण 1 लाख 44 हजार रूपयांचे मुद्देमाल लंपास केले. ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून गुन्हा उलगडण्यासाठी नंदूरबार येथील ठसे तज्ञांना पाचाराण करण्यात आले. शहाद्यात मकरसंक्रांतीच औचित्य साधुन चोरट्यानी धाडसी घरफोडी केल्याने पोलीसांपुढे मोठे आव्हान ठरले आहे.