शहाद्यात नागरी सुविधांचा डोलारा फुसका

0

शहादा (गणेश सोनवणे)। मागील काही वर्षात शहादा शहराचा विस्तार फार मोठ्या प्रमाणात झाला आहे. त्याप्रमाणात शहरासाठी आवश्यक असलेल्या नागरी सुविधांची व्यवस्था झालेली नाही. पाण्याच्या योजनेवर खुप मोठ्या प्रमाणात निधी खर्च झालेला आहे. तरीही समस्या मात्र आजपावेतो तशीच्या तशीच आहे. आठशे रुपयांची पाणीपट्टी असताना पाण्यासाठी जेवढे हाल होत होते.तेवढीच दोन हजार पाणी पट्टी भरुनही हाल आहेत उलट त्यापेक्षा अधिकचे हाल आहेत. अनेक ठिकाणी चार दिवसा आड पाणी सोडण्यात येत आहे. शहरात अनेक वर्षापासुन सारंगखेडा येथुन तापी नदीवरुन शहादा शहराला पाणी पुरवठा करण्यासाठीची जवळपास 20 कोटीची योजना सुरु करण्यात आली. योजना सुरु होण्याअगोदरपासुन पाणीपट्टी वाढवुन शहरवासीयाना ह्या पाण्याचे दर्शन नाही आणि केव्हा मिळेल याची शाश्वती सुध्दा नाही.

..तर सारंगखेडापर्यंत पाईपलाईन बसविण्याची गरज नसती भासली
पावसाच्याबाबतीत कभी खुशी तो कभी गम असा अनुभव शहादा शहरवासियाना अनुभवयाला मिळते आहे. नदीवर पाणी अडविण्यासाठीची सोय करण्यात आली असती तर पिण्याचा पाण्यासाठी प्रशासनाला सारंगखेडापर्यंत पाईपलाईन बसविण्याची गरज भासली नसती. सुसरीसारखे गोमाई नदीवर पाच ते सहा ठिकाणी जर हे पाणी अडविण्यात आले असते आणि शहरालगत गोमाई नदीची झालेली गटारगंगा शहरवासियासाठी नदीपात्रात केलेली घाण नगरपालिकेचा हलगर्जीपणाचा कळसच म्हणावा लागेल. ह्या घाण पाण्यामुळे आजुबाजुला रहाणार्‍या वस्तीतील लोकांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. अनेक रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे. तापी नदीवरुन आणलेल्या पाण्याच्या पाईपलाइनमध्ये योग्य अशी तांत्रिक संकल्पना नाही. त्यामुळे ही योजना आजपावेतो रखडलेलीच आहे.

जलस्त्रोत नियोजनाचा अभाव
वास्तविक पहाता शहराला उपलब्ध असलेल्या नैसर्गिक जलश्रोताचे नियोजन काळानुसार करण्यात आले असते तर शहराला या समस्यांना सामोरे जावे लागले नसते. शहरालगत वाहणारी गोमाई नदीचे पात्र जरी योग्यरितीने सांभाळले असते. दुसरीकडे जाण्याची गरज भासली नसती.शहराची व शहरवासियांची आजारी मानसिकताच या गोष्टीना कारणीभुत आहे. नगरपालीका प्रशासनाकडे तर एवढीही दुरदृष्टी नाही की भविष्यात जेव्हा शहराचा विस्तार होईल.तेव्हासाठीच्या पिण्याच्या पाण्याचे व जलनिस्सारनाचे प्रयोजन काय ? मात्र शहादा शहराला अधिकारी व पदाधिकारी या तळमळीचे मिळाले नाहीत की ज्यांचामध्ये शहराप्रती आस्था व दुरदृष्टी असावी. जे आले त्यानी फक्त आपला कार्यकाळ पुर्ण करण्यावरच भर दिला आहे. दिवसेंदिवस पाण्याचे प्रश्न वाढत आहे हे सर्व सामान्याना कळते आहे. नैसर्गिक पाण्याचा स्त्रोत म्हणजे पावसाळा परंतु त्यातही पुर्वीसारखे सातत्य राहिले नसल्याने बारमाही वाहणार्‍या नद्या आता उरल्याच नाहीत.

पाणी, रस्ते ,अतिक्रमण, स्वच्छतेकडे नाही लक्ष
शहरवासियांच्या लुटमारीची कोणतीच संधी ही नगरपालिका सोडत नसल्याचे जनसामान्यांचे म्हणणे आहे. नवीन पाईपलाइन तर टाकली परंतु त्याच ग्राहकाना कनेकशन जोडण्यासाठी पुन्हा 1400 रुपयाची मागणी नगरपालिका करत असल्याची कुजबुज जनतेत सुरु आहे.पाणी, रस्ते ,अतिक्रमण स्वच्छता याकडे लक्ष न दिल्यामुळे नागरिकांनी कॉग्रेससत्ता उलथवून टाकली असुन नगरपालिकेवर पहिल्यांदा भाजप सत्तेवर आले आहे. त्यामुळे आता नव्याने निवडुन आलेले राजकीय पदाधिकारी तसेच नगरपलीका प्रशासन यांच्यात किती ताळमेळ बसतो व शहराचे प्रश्न मार्गी लागतात.हे तर वेळच ठरविणार आहे. दोन हजार पाणीपट्टी अनेक वर्षापासुन नगरपालिका शहरवासियांकडून वसुल करते आहे. मात्र शहरवासियांना पाणी मिळत नाही ही केवढी मोठी शोकांतिका आहे. शहादा शहराची जलशुध्दीकरण प्रकल्पाच्या सगळ्या मोटारी एकाच वेळेस खराब होतात. पाण्याची पाईप लाईन टाकणारा ठेकेदार त्याचा मनमानीने पाइपलाइन टाकतो आहे.त्यात कोणतेच तांत्रीक मार्गदर्शन न घेता , न देता फक्त ठेकेदाराला जसे जमेल तसे ठेकेदाराने हि पाईपलाईन अंथरली. मात्र यात किती कामाचे बारा वाजले आहेत.

पाचवर्षात कामे झाली ठप्प
शहरात व सारंगखेडा ते शहादापर्यंत जी पाईपलाईन टाकण्यात आली आहे.ती अनेक ठिकाणी गळत असल्याचे चित्र आहे.याचाच अर्थ अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम ठेकेदाराने केले आहे.यात न.पा.पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी काय बघत होते. त्यानी लक्ष दिले का ?या निकृष्टदर्जाच्या कामामुळे अनेक ठिकाणी अपघात घडले आहेत. अनेक ठिकाणी गाड्या अडकल्या म्हणजेच काम करतांना कोणतीच मापके ध्यानात घेण्यात आले नाहित ही वस्तुस्थिती आहे .मागच्या निवडणूकीत आ.चंद्रकांत रघुवंशी यानी शहादेकराना शब्द दिला होता की पाणीपट्टी दोन हजारावरुन सोळाशेपर्यंत करण्यात येइल. मात्र पाचवर्ष होवुन ही काहीच झाले नाही. याचाच फटका शहादेकरानी यावेळी काँग्रेसला दिला आहे हे ही तेवढेच सत्य आहे. शहादेकर शुध्द पिण्याचा पाण्याची वाट पहात आहेत. ते पाणी शहराला कधी मिळते हा सुध्दा मोठा प्रश्न आहे.