शहाद्यात नॉयलॉन मांजाची विक्री करणार्‍या विक्रेत्यांवर कारवाई

0

शहादा- नॉयलॉन मांच्या विक्रीसह खरेदीवर बंदी असताना शहरात बेधडक नॉयलॉन मांजाची विक्री होत असल्याने पोलिस व नगरपालिका प्रशासनातर्फे मंगळवारी धडक कारवाई करीत नॉयलॉन मांजा जप्त करून तिघांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. तहसीलदार मनोज खैरणार यांच्या मार्गदर्शनाखाली सर्कल बी ओ पाटील, पोलिस उपनिरीक्षक बी.डी.शिंदे, मुख्याधिकारी राहुल वाघ, आरोग्य निरीक्षक आर.एम.चव्हाण, गोटु तावडे, पोलिस महेंद्र ठाकूर, दादाभाई साबळे आदीच्या पथकाने कारवाई केली.मकरसंक्रातीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात पतंगमांजाची विक्री होते तर नायलॉन मांजामुळे होणार्‍या अप्रिय घटना पाहता खबरदारी म्हणून तहसीलदार मनोज खैरणार यांनी मांजा विक्रेत्यांवर कारवाईचे आदेश दिले होते.