शहादा : शहादा तालुका मराठी पत्रकार संघातर्फे पत्रकार दिन निमित्त आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तहसीलदार नितीन गवळी व मान्यवरांचा उपस्थितीत येथील पत्रकार संघाच्या कार्यालयात हा कार्यक्रम झाला कार्यक्रमप्रसंगी पोलीस उपाधीक्ष लतिफ तडवी., पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत, जि प. सदस्य अभिजित पाटील, प्रा. संजय जाधव, अॅड. राजेश कुलकर्णी, धनराज पाटील, जितेंद्र जमदाडे, संदीप पाटील, मंडळ अधिकारी समाधान पाटील, अनिल भामरे, मनलेश जैसवाल, दिलीप जैन, भगवान अलकारी आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना तहसीदार नितीन गवळी म्हणाले कि, लोकशाहीच्या चौथा स्तंभ असलेला पत्रकार हा समाजाला दिशा देण्याचे काम करतो पत्रकारांमुळे समाजतील उपेक्षित घटकांना न्याय मिळत असल्याने समाज परिवर्तनात त्यांची भूमिका मोलाची ठरत आहे. यावेळी ज्येष्ठ पत्रकार संजय राजपूत व राजेंद्र गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक संजय राजपूत यांनी तर आभार जिल्हा पत्रकार संघाचे सरचिटणीस नरेंद्र बागले यांनी मानले. यावेळी अध्यक्ष ईश्वर पाटील, रुपेश जाधव, हर्षल सोनवणे, संतोष जव्हेरी, जे.एम.पाटील, धनराज गोसावी, प्रफुल्ल सूर्यवंशी, सतीश पाटील, राधेशाम कुलथे यांनी परिश्रम घेतले.