शहाद्यात पदव्युत्तरच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण

0

शहादा:देशात कोरोनाच्या संसर्गजन्य आजाराने थैमान घातले आहे. या कालावधीत केंद्र व राज्य शासनाने संपूर्ण लॉकडाऊन केले आहे. यामुळे महाविद्यालयाचे कामकाज ठप्प आहे. महाविद्यालयातील पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या सत्र परीक्षा जवळ आल्या असतांना लॉकडाऊनमुळे त्यांचा उर्वरित अभ्यासक्रम पूर्ण करणे आवश्यक होते. यावर पर्याय म्हणून साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील प्राध्यापकांनी प्राचार्य डॉ. राजेंद्र पाटील यांचे मार्गदर्शनात पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन शिकविण्याचे काम सुरू केले आहे.

विद्यार्थ्यांचे कोणतेही शैक्षणिक नुकसान होणार नाही व त्यांचा सर्व अभ्यासक्रम पूर्ण व्हावा, यादृष्टीने विविध ऑनलाईन पद्धतीचा अवलंब स्वीकारला आहे. त्यात व्हाट्सअ‍ॅप ग्रुपवर मार्गदर्शन, झूम क्लाऊड मिटिंग अ‍ॅपद्वारे तास, गूगल डिओ, मुडल, युट्युब क्लासेस आदी ऑनलाईन माध्यमांचा वापर करत विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देणे सुरू असून विद्यार्थ्यानी त्याचा उत्तमप्रकारे फायदा करून घेतला. विविध माध्यमातून संपर्क करत विद्यार्थ्यांनी सुरक्षितता पाळून काळजी घेण्याचे आवाहन केले.