शहाद्यात पोलीसांचे गावभर पथसंचलन

0

शहादा। गणेशोत्सव व बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर शहरात पोलिसांचे संचालन करण्यात आले. पोलीस अधिक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहाद्या शहरात पथसंचलन कारण्यात आले. आगामी गणेशोत्सव व बकरी ईदच्या पार्श्‍वभूमींवर कायदा व सुव्यवस्था अबाधीत रहावे यासाठी नंदुरबार जिल्हा पोलीस दल व शहादा पोलीस दलातर्फे विविध उपाययोजना करण्यात येत आहे. आगामी सण उत्सवाचा अनुषंगाने गुन्हेगारी, समाज विघातक प्रवृत्तीचा तसेच कायदा व सुव्यवस्था बिघडवणार्‍या व्यक्तींवर प्रचलीत कायद्यानुसार कठोर प्रतिबंधक उपाययोजना करण्यात येत आहेत.

अधीक्षक संजय पाटील यांचे लाभले नेतृत्व
दरम्यान शहादा पोलीस ठाणे येथुन नंदुरबार पोलीस अधीक्षक संजय पाटील यांचा मार्गदर्शनाखाली शहरातुन सायंकाळी पथसंचलन करण्यात आले. या पथसंचलनात नंदुरबार अप्पर पोलीस अधिक्षक प्रशांत वाघुंडे यांचा मार्गदर्शनाखाली काढण्यात आली. पथसंचालनात उपविभागीय पोलीस अधिकारी एम. बी . पाटील ,शहादा पोलीस निरिक्षक शिवाजी बुधवंत सह बाराअधिकारी व 150 पोलीस कर्मचारी, होमगार्ड तसेच एक एसआरपिएफचे प्लॅटुन सामील झाले होते. पथसंचलन पोलीस ठाणे येथुन बाजार चौक, जामा मशिद , पिंजार गल्ली , आझाद चौक लालदास चौक , कुकडेल गांघी चौक ,गुजर गल्ली ,इकबाल चौक , बागवान गल्ली जनता चौक करत शहादा पोलीस स्टेशन येथे संपली.