शहादा । शहादा तालुका मंसूरी – पिंजारी समाजाच्या वतीने चौदा वधु वरांचा सामूहिक विवाह सोहळा आ.उदेसिंग पाडवी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या मेळाव्यासाठी समाजातील पाच हजार महिला व पुरुषांची उपस्थिती होती. गरीब नवाज कॉलनी व माजी नगरच्या परिसरात मंसुरी-पिंजारी समाजाने या सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले होते.
आ.उदेसिंग पाडवी यांनी केले प्रबोधन
आ.उदेसिंग पाडवी यांनी म्हटले की, सामूहिक विवाह सोहळा काळाची गरज आहे. त्यामुळे आदर्श निर्माण होतो सर्वांची आर्थिक परिस्थिती सारखी नसते, प्रत्येक धर्म, समाज, यांच्यात सामूहिक विवाह सोहळयास प्रोत्साहन देणे आज आवश्यक आहे. मंसुरी-पिंजारी समाजाने सामूहिक विवाहाचा आदर्श घडवून दिला आहे. समाजाच्या चांगल्या उपक्रमासाठी आमदार निधीतून भोजनगृहासाठी तेरा लाख रूपये मंजूर करु व एक महिन्याच्या आत त्याचे भूमिपूजन करणार असे आ. पाडवी यांनी सांगितले. सामूहिक विवाह सोहळा यशस्वितेसाठी हाजी नबी मंसुरी, फरीद हाजी मंसुरी, कलीम मंसूरी, नासिर मंसुरी, मजाज मंसुरी, हाजी युनुस मंसुरी, हाजी सुलतान मंसुरी, अजीज पिंजारी, हाजी युसूफ पिंजारी, नज़ीर पिंजारी, खलील पिंजारी सह मंसुरी- पिंजारी समाजाने परिश्रम घेतले.
यांची होती उपस्थिती
नगराध्यक्ष मोतीलाल पाटील, चेअरमन दीपक पाटील, प्राचार्य मकरंद पाटील, डॉ.किशोर पाटील, शेख अख्तर शे. मुनीफ युसा मंसुरी (दोंडाइचा), वसीम तेली, अब्दुल मंसुरी, नईम मंसुरी (नंदुरबार), सरफराज मंसुरी(माजी नगरसेवक धुळे), जावेद टेलर (तळोदा), हाजी खलील हाजी सत्तार बबलू मंसुरी, बिलाल मंसुरी, अकबर पटेल(खेतिया), जितेंद्र जमदाळे, अतुल जयस्वाल, ए.एम्.पाटील, दिनेश खंडेलवाल,सचिन पाटील, आरिफ पिंजारी उपस्थित होते.