शहाद्यात महापरिनिर्वाण दिनानिमित्त विविध ठिकाणी अभिवादनाचा कार्यक्रम

शहादा। शहरात विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विविध ठिकाणी अभिवादनाचा कार्यक्रम घेण्यात आला. जुन्या तहसीलदार कार्यालयाजवळील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून त्रिशरण, पंचशील ग्रहण करुन आदरांजली वाहिली. तसेच प्रशिक मंडळ, नगर पालिका, पंचायत समिती कार्यालय आदींसह विविध शासकीय कार्यालयात महामानवाला अभिवादन करण्यात आले.

तहसीलजवळील कार्यक्रमावेळी आ.राजेश पाडवी, तहसीलदार डॉ.मिलिंद कुलकर्णी, पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत, माजी जि.प.सभापती अभिजीत पाटील, अरविंद कुवर, प्रा.मकरंद पाटील, राजेश्वर सामुद्रे, जितू जमदाळे, नामदेव पटले, झेलसिंग पावरा, सुरेश मोरे, अनिल भामरे, तात्या पवार, अलका जोंधळे, चेतन साळवे, लता कुवर, दादाभाई पिंपळे, गजेंद्र निकम, सुरेंद्र कुवर, सुनील गायकवाड, सुनील शिरसाठ, दिलीप जगदेव, मनलेश जायस्वाल, नरेंद्र कुवर, पत्रकार नेत्रदीपक कुवर, बापू घोडराज, मिलिंद शिरसाठ, संतोष कुवर, चंद्रविलास बिर्‍हाडे, शिवाजी महालेने, चेतन गांगुर्डे, जितेंद्रिय बर्मा, इकबाल शेख, विनायक साळवे, देंवेद्र कुवर, जितेंद्र मोरे, प्रा.मनोज गायकवाड, सुनील पाटोळे, रवींद्र नगराळे, निमा पटले, वैशाली पवार, संजय निकुंभे, अर्चना निकुंभे यांच्यासह शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.