शहादा । राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 61 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विविध संघटनांच्यावतीने आदरांजली अर्पण करण्यात आली. तहसील कार्यालयात सकाळी दहा वाजेच्या सुमारास डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुर्णाकृती पुतळा परिसरातडॉ.आंबेडकरांना सामूहिक श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. यावेळी आरपीआयचे जिल्हाध्यक्ष अरविंद कुवर, बापूजी जगदेव, माजी नगरसेवक दादा जगदेव, रिपब्लीकन एम्पॉलॉईज फेडरेशनचे शशिकांत कुवर, सुरेंद्र कुवर, अनिल कुवर, मुनेश जगदेव,नरेंद्र कुवर यांच्यासह सिध्दार्थ युवा मंच, प्रशिक बहुउद्देशिय संस्था आदि संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी सामूहिक बुध्दवंदनेचे पठण करण्यात आले.
सिध्दार्थ नगर
सायंकाळी साडे सात वाजेच्या सुमारास परिसरातील महिला व पुरुषांसह युवकांनी कँडल मार्च काढला. शहरातील मुख्यमार्गाद्वारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत कॅण्डलमार्च आल्यानंतर येथे सामूहिक श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुर्णाकृती पुतळ्यास समितीच्या सदस्यांच्यावतीने पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी शहरमंत्री प्रितम निकम, तालुकाप्रमुख अक्षय चित्ते, शहर महाविद्यालयीन शाखा प्रमुख स्वप्निल जैन, शहर आंदोलन प्रमुख प्रतिक चव्हाण, जिल्हा संयोजक डिगंबर पवार, रोहन माळी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
कँडल मार्च
सायंकाळी सात वाजेच्या सुमारास डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक परिसर, भारिप बहुजन महासंघ नागसेननगर, बी.बॉईज ग्रृप यांच्या संयुक्त विद्यमाने खेतिया रस्त्यावरुन कँडल मार्च काढण्यात आला. तहसील कार्यालय परिसरात पुर्णाकृती पुतळ्यापर्यंत आपल्या महानायकाचे नामस्मरण करीत कँडलमार्च पोहचला. तेथे भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष रविंद्र मोरे, बी.बॉईज ग्रुपचे अध्यक्ष धनराज ईशी, शहराध्यक्ष विश्वजीत भामरे, भाजपा दलित आघाडीचे शहराध्यक्ष पिरन मोरे यांनी पुष्पहार अर्पण करुन बाबासाहेबांना अभिवादन केले. बुध्दवंदनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.