शहादा: कोरोना विषाणुंचा प्रादूर्भाव वाढू नये म्हणून शहादा येथे लाँकडाऊनमध्ये धोबी समाजातील जोडप्याने सामाजिक व भौतिक अंतर राखून शासनाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे पूर्णपणे पालन करीत मोजक्याच पाहुण्यांच्या साक्षीने आदर्श विवाहाची रेशिम गाठ बांधली.कोरोनाच्या महामारीत शुभ मंगलमय विवाह सापडले आहेत. या संकटावर मात करण्यासाठी वधु-वर पक्षाने योग्य तो निर्णय घेतला.
शहादा येथील गणेश (अप्पा) भगवान बच्छाव यांचे सुपुत्र चि.अँड.अतुल व अमळनेर येथील संभाजी महादु जाधव यांची सुकन्या चि.सौ.कां. लिना यांचा शुभविवाह २४ मे रोजी सकाळी १०.३० वाजता अत्यंत साध्या पध्दतीने उत्साहात झाला.
याप्रसंगी धोबी समाजाचे ज्येष्ठ सल्लागार सुभाष बच्छाव, गणेशआप्पा बच्छाव, प्रदेश उपाध्यक्ष लोटन धोबी, शहादा धोबी समाजाचे अध्यक्ष विठ्ठल बच्छाव, विभागीय युवा अध्यक्ष संतोष वाल्हे, भिक्कन काकुलदे, प्रकाश राव आदी उपस्थित होते.
शुभ मंगल ठिकाणी प्रवेशदारातच सँनिटायझर फवारणीचा तंबू लावण्यात आला होता. शिवाय प्रत्येकाला मास देण्यात आला.अत्यंत शिस्तीने उपस्थितांनी फिजिकल डिस्टींगचे तंतोतंत पालन केले. नव वधुवरास उपस्थितांनी शुभमंगलमय शुभेच्छा देत धोबी समाजातील आदर्श विवाहाचे कौतुक होत आहे.