शहाद्यात रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाचे भूमिपुजन

0

शहादा । येथील प्रभाग क्रमांक 5 मधील रस्त्यांच्या कॉक्रीट करण्याचे भूमिपूजन नगराध्यक्ष मोतीलाल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. दलित वस्ती सुधार योजनेअन्तर्गत सुमारे 30 लक्ष रुपयांच्या कामांचे भूमिपूजन करण्यात आले.प्रभाग क्रमांक 5 मधील शिवराम नगर ते बबनशाह नगर येथे 5.38 लाख रूपये व संत रोहिदास नगर ते हाजी बबनशाह नगर या रास्त्यांचे 23. 69 लाख रूपये करुन ट्रीमिक्स कॉन्क्रिटिकरण पद्धतीने या रस्त्यांची निर्मिति करण्यात येणार आहे.

यावेळी उपनगराध्यक्ष रेखा चौधरी, शिक्षण सभापती उषा पेंढारकर, पाणी पुरवठा सभापती शमिन बी शेख हकीम , नगरसेविका रीमा पवार, नगरसेवक प्रशांत कुवर, संदीप पाटील, संजय साठे, लक्ष्मण बढ़े, बांधकाम अभियंता संजय संधानशिवे, संतोष वाल्हे, परेश पवार, एकनाथ नाईक, आरपीआय जिल्हाध्यक्ष अरविंद कुवर, अजित बाफना, चंद्रकांत पाटील, अक्षय अमृतकर, खुशाल भट, अबरार शाह, निहालखान आदि उपस्थित होते.