शहादा । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या 78 व्या वाढदिवसानिमित्त शहादा तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेसपक्षातर्फे नगरपालिकेच्या दवाखान्यात आंतररूग्ण विभागातील रूग्णांना फळे वाटप करण्यात आले.
यावेळी नगरसेवक ईकबाल अन्सारी, राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस सुरेंद्र कुवर, राष्ट्रवादी ग्रंथालय विभागाचे दिनेश पाटील, युवा कार्यकर्ते महेंद्र कुवर, सचिन अहिरे, राष्ट्रवादी मागासवर्ग सेलचे जिल्हाध्यक्ष गौतम अहिरे, तुषार समुदे्र, विशाल भालेराव, महेंद्र अहिरे, रमिज तेली, सिद्धार्थ कुवर, विलास कुवर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.